अष्टविनायक यात्रा शास्त्रोक्त पद्धतीने करण्याचा विधी / मार्ग खालील प्रमाणे साध्य होऊ शकेल
यात्रेचे नियम आणि माहिती.
१) अष्टविनायक यात्रा हि शास्त्रोक्त पद्धतीने केल्यास ती सफल होते.
२) यात्रा मार्ग हि खालील प्रमाणेच क्रमवारीत असावी.
३) सुरवात हि मोरगाव आणि शेवट हा मोरगाव ला येउनच अष्टविनायक यात्रा शास्त्रोक्त पद्धतीने पूर्ण होते.
४) प्रवासा दरम्यान कोण्याच्याही घरी ( नातेवाईक , मित्र ) थांबू नये किवा परत घरी येऊन यात्रेला जाऊ नये.
५) मार्केट मध्ये खूप टुरिस्ट कंपनी आहेत पण त्या तुम्हाला योग्य क्रमवारी प्रमाणे यात्रा करवत नाहीत.
६) या यात्रेसाठी तुम्हाला ३ दिवस आणि २ रात्री एवढा वेळ लागेल.
७) हि यात्रा करताना तुम्हाला काहीच थकवा जाणवणार नाही, बाप्पा तुमचे सगळ्या अडचणी आणि प्रवासातील विघ्न दूर करतील.याचा अनुभव तुम्हाला येईल.
८) मनोभावे केलेल्या यात्रेची पूर्णाहुती जेव्हा मोरगाव स्थळी पूर्ण होईल, तेव्हा पूर्ण समाधान आणि आनंद याचा दिव्य अनुभव तुम्हाला येईल.
दिनांक २०-५-१४ रोजी आम्ही पुण्याहून अष्टविनायक यात्रेला आरंभ केला -
१) स्वारगेट ते मोरगाव अंतर ( मोरेश्वर ) -- मार्ग-
स्वारगेट- - हडपसर- सासवड- जेजुरीमधून डावीकडून - मोरगाव
कि.मी.- अंतर- ६८ , प्रवास वेळ - सकाळी ७ ते ९
२) मोरगाव ते सिद्धटेक ( सिद्धिविनायक ) - मार्ग- मोरगाव- चौफुला - पाटस - टोल नाक्याच्या आधी डावीकडे वळून दौंडच्या दिशेने जाणे - सिद्धटेक.
कि.मी.- अंतर- ६७ , प्रवास वेळ - सकाळी १०.३० ते १
३) सिद्धटेक ते पाली ( बल्लाळेश्वर ) - सिद्धटेक - दौंड- यवत - हडपसरपुणे - येरवडा - मुंबई हायवे - निगडी - देहू मार्गे मुंबई एक्स्प्रेस हायवे - उरसे टोल नाका - आणि खालापूर टोल नाका येण्यापूर्वी ५०० मीटर अंतरावरून डावीकडे वळावे - पाली
नोट- उर्से टोल नाक्यावर फक्त कुसगाव पर्यंत चीच पावती काढावी पुढील काढू नये रु. ११७/-, जेव्हा एक्स्प्रेस हायवे सोडून डावीकडे पालीच्या दिशेने जाता आणि तेव्हा जर तुम्ही उन्हाळा च्या सिझन मध्ये जात असाल तर वाटेत तुम्हाला खूप काळीमैना चा आस्वाद घ्यायला मिळेल.
कि.मी.- अंतर- २३८ , प्रवास वेळ - दुपारी १.३० ते ५
४) पाली ते महड ( वरदविनायक ) - पाली- खोपोली फाटा - महड
नोट- पाली येथे राहण्याची नीट व्यवस्था नसल्याने तुम्हाला लोणावल्याला थांबलेले परवडेल .कारण इलेक्ट्रीकल लोड शेडींग असल्याने रात्री झोपणे मुश्कील होईल.
कि.मी.- अंतर- ४२ , प्रवास वेळ - संध्याकाळी ६.०० ते ७
५) महड ते लोणावळा - नोट- लोणावळ्यात एन्ट्री केल्यावर लगेच तुम्हाला ओवर हेड ब्रिज खाली हॉटेल शारदा मिळेल तिथे तुम्ही रुपये. १५००/- मध्ये राहू शकता.
कि.मी.- अंतर- २४ , प्रवास वेळ - रात्री ७.०० ते ८.३०
दिवस दुसरा -
६) लोणावला ते थेऊर ( चिंतामणी ) - लोणावळा जुना हायवेने - देहू - निगडी - खडकी- येरवडा- हडपसर- थेऊर
नोट - थेऊर ला मंदिराच्या शेजारी महाप्रसाद व्यवस्था आहे. तिथेच दुपारचे जेवण करावे खूप छान सात्विक थाळी मिळेल.
कि.मी.- अंतर- १०१ , प्रवास वेळ - सकाळी ८.०० ते १०.३०
७) थेऊर ते लेण्याद्री ( गिरिजात्मज ) -- थेऊर - हडपसर- येरवडा- मुंबई हायवे - नाशिकफाटा - राजगुरुनगर - नारायणगाव च्या ५०० मीटर अंतर पुढे जाऊन डावीकडे - लेण्याद्री
नोट- तुम्ही आता खूप सुंदर निसर्गरम्य वातावरणामध्ये आहात, हे स्थान डोंगरावर कोरलेल्या लेण्यामध्ये आहे. वरती जाताना आपल्या बैग,पिशवी गाडीतच ठेवा कारण डोंगरा वरील माकडे न घाबरता तुमच्या हातातील वस्तू ओढून नेतील किवा तुम्हाला इजा पोहोचवतील, जाताना हातात काठी जरूर ठेवा. या ठिकाणी तुम्हाला राहण्याची खूप छान व्यवस्था आहे , हॉटेल लेण्याद्री मध्ये राहू शकता आणि एसी रूमची काही गरज भासणार नाही.
कि.मी.- अंतर- १३० , प्रवास वेळ - सकाळी ११.४५ ते ०३.३०
दिवस तिसरा -
८) लेण्याद्री ते ओझर ( विघ्नहर ) -
कि.मी.- अंतर- १६ , प्रवास वेळ - सकाळी ७.३० ते ८.००
९) ओझर ते रांजणगाव ( महागणपती ) - ओझर - राजगुरुनगर - पाबळ - शिक्रापूर - रांजणगाव
कि.मी.- अंतर- ९७ , प्रवास वेळ - सकाळी ९.०० ते ११.१५
१०) रांजणगाव ते मोरगाव ( मोरेश्वर ) - रांजणगाव - वाघोली- रामवाडी फाटा- डावीकडून - खराडी बायपास - हडपसर- सासवड- जेजुरीतून डावीकडून - मोरगाव.
कि.मी.- अंतर- ११३ , प्रवास वेळ - सकाळी ११.४५ ते २.३०
११) मोरगाव ते पुणे स्वारगेट -- मोरगाव - जेजुरी - सासवड - हडपसर - स्वारगेट पुणे.
कि.मी.- अंतर- ६६ , प्रवास वेळ - दुपारी ४.३० ते ६.४५
एकूण कि.मी. = ९६२